Udise Pluse -2024-2025 माहिती अपडेट करणे| शाळा सर्टिफाइड करणे.|
सन 24 25 या वर्षांमध्ये राज्यातील सर्व शाळांची माहिती यु-डायस प्लस मध्ये ऑनलाइन काम शाळास्तरावर माहे ऑगस्ट 2024 पासून सुरू आहे. दि. 01/04/2025 पासून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने सर्व शाळांची अचूक माहिती यु-डायस प्लस प्रणालीवर भरून अंतिम करणे आवश्यक आहे याबाबत केंद्र शासनाकडून दि. 20/03/2025 पर्यंत राज्यातील सर्व केंद्र शासनाकडून सर्व शाळांची माहिती अंतिम करून प्रमाणित करण्यासाठी कळविले आहे याच माहितीच्या आधारे सण २०२४-२५ PLC, वार्षिक नियोजन अंदाजपत्रकासाठी माहिती वापरण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सर्व शाळांची अचूक माहिती तपासून अंतिम करण्यासाठी आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे त्याचप्रमाणे जिल्हा व तालुका स्तरावरून सण 2024- 25 ची माहिती.दि. 25/03/2025 पर्यंत अंतिम करून प्रमाणपत्राची प्रत या कार्यालयास ईमेलद्वारे व यु-डायस प्लस पोर्टलवर अपलोड करण्यात यावी.

No comments:
Post a Comment