शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांचे कार्य मूल्यमापन अहवाल. गोपनीय अहवाल (नविन)
गोपनीय अहवाल (नविन):-
प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या वर्षभरातील कामाचे मूल्यमापन त्याचे वरिष्ठ अधिकारी गोपनीय अहवालाच्या स्वरूपात करतात. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा कालावधी 1 एप्रिल,20..... ते 31 मार्च,20..... असा असतो. यालाच प्रतिवेदन कालावधी असे म्हणतात.
💠शासन निर्णय:- 7 फेब्रुवारी 2018 CLICK HERE
गोपनीय अहवाल (नविन):-
भाग १-( पहिली दोन पाने ) कार्यालय प्रमुखांनी भरावयाचे असून त्यात खालील नोंदी कराव्यात.
१) मूल्यमापन कालावधी १ एप्रिल२०.... ते ३१ मार्च २०.... असा लिहावा.'गोननीय अहवाल नविन'
२) कर्मचाऱ्यांचे संपूर्ण नाव लिहावे.
३) संवर्ग कर्मचाऱ्यांचा पदारचा संवर्ग लिहायचा आहे.
४) कर्मचाऱ्यांचे पद लिहावे.
५) सध्याच्या पदाचा नियुक्ती दिनांक.
६) कार्यालयाचे नाव लिहावे.
७) प्रतिवेदन अधिकारी व पुनर्विलोकन अधिकारी यांचा तपशील ( प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीत प्रतिवेदन अधिकारी - पात्र/ ग्रेड मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख, पुनर्विलोकन अधिकारी - विस्तार अधिकारी अथवा गटशिक्षणाधिकारी.
८) कर्मचाऱ्यांच्या रजेचा तपशील.
९) प्रशिक्षणाचा तपशील.
१०) मत्ता व दायित्व विवरण विषयक तपशील.
भाग २- स्वयं मूल्यमापन निर्धारण अहवाल ( कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या अक्षरात भरावा )
१) पदाला निश्चित करून दिलेली कामे त्यांचा उल्लेख." गोपनीय अहवाल नविन"
जसे,
✒️ शिक्षकांच्या बाबतीत अभ्याक्रम पूर्ण करणे.
✒️१००% पट नोंदणी उपस्थिती ठेवणे.
✒️ सहशालेय उपक्रम राबवणे.
✒️ अध्ययन निष्पत्ती नुसार अध्ययन अनुभव देणे.
✒️ नियोजन अनुसार अभ्यासक्रम पूर्ण करणे.
२) प्रतिवेदनाच्या कालावधी करिता नेमून दिलेल्या कामाची उद्दिष्टे - मूल्यमापनाच्या कालावधीच्या वर्षात शासनामार्फत राबविलेले विशेष उपक्रम, त्याबाबत कर्मचाऱ्याला ठरवून दिलेली उद्दिष्टे
जसे,
✒️ सेतू अभ्यासक्रम राबवून विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या मुख्य प्रवाहात आणणे.
✒️ विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती करणे.
✒️ वीत कालावधीत विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरांमध्ये सुधारणा करणे.
✒️ वेळोवेळी अध्ययन स्तर निश्चिती करून कृती आराखडा नूतनीकरण करणे. गोपनीय अहवाल नविन
✒️ कृती आराखड्यानुसार विविध उपक्रम बनवणे.
३) वर्षभरात पार पाडलेल्या उल्लेखनीय कामाची माहिती येथे लिहावी
४) उद्दिष्टे पूर्ण करताना आलेल्या अडचणीचा उल्लेख येथे करावा.
५) कर्मचाऱ्यास कोणत्या प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज आहे त्याचा उल्लेख करावा.
६) मागच्या वर्षीच्या 31 मार्च आणि मत्ता व दायित्व विवरण सादर केले आहे का काय?
७) कर्मचारी स्वाक्षरी.
भाग ३- प्रतिवेदन अधिकाऱ्याने लिहायच्या मूल्यमापन अहवाल.
भाग ४- पुनर्विलेखन लेखन अधिकाऱ्याची मूल्यमापन.
📃 गोपनीय अहवाल कोरा :-
📃 गोपनीय अहवाल भरलेला नमुना :-


