सुस्वागतम...सुस्वागतम... सुस्वागतम...

Showing posts with label आधार बेस्ड बायोमेट्रिक उपस्थिती(AEBAS) कशी नोंदवावी | बायोमेट्रिक हजेरी. Show all posts
Showing posts with label आधार बेस्ड बायोमेट्रिक उपस्थिती(AEBAS) कशी नोंदवावी | बायोमेट्रिक हजेरी. Show all posts

आधार बेस्ड बायोमेट्रिक उपस्थिती(AEBAS) कशी नोंदवावी | बायोमेट्रिक हजेरी

आधार बेस्ड बायोमेट्रिक उपस्थिती(AEBAS) कशी नोंदवावी | बायोमेट्रिक हजेरी

बायोमेट्रिक हजेरी

आधार बेस्ड बायोमेट्रिक उपस्थिती (AEBAS) नोंदविणे बाबत...

                                   सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद परभणी यांचे दिनांक:-04/04/2025 आधार बेस्ड बायोमेट्रिक हजेरी नोंदवणे बाबतची परिपत्रक.
आधार बेस्ड हजरी
 आधार बेस्ट बायोमेट्रिक हजेरी 

  
परिपत्रक :-

 १)                  संदर्भीय परिपत्रकान्वये जिल्हा परिषद अंतर्गत सर्व कार्यालय प्रमुख यांना अधिकारी / कर्मचारी यांचे दैनंदिन उपस्थिती बायोमेट्रिक उपस्थिती (AEBAS) प्रणाली वरच नोंदविणे बाबत निर्देश देण्यात आले असून दिनांक:-०१ ऑक्टोबर, २०२४ पासून बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्य केली आहे. कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांची दररोज शासनाने निश्चित केलेल्या कार्यालयीन वेळेत कार्यालयात आल्यावर तसेच कार्यालयीन वेळ संपल्यावर कार्यालय सोडताना उपस्थिती बायोमेट्रिक प्रणाली द्वारे नोंदविणे तसेच कार्यालय प्रमुखांनी अधिनिस्त अधिकारी कर्मचारी दैनंदिनी उपस्थिती बायोमेट्रिक उपस्थित प्रणालीवर 100% नोंदवितील याची दक्षता घेणे बाबत निर्देश दिलेले आहेत.

आधार बेस्ड बायोमेट्रिक उपस्थिती कशी नोंदवावी?Click here


२)               तथापि सदर निर्देशाचे पालन होत नसल्याची निदर्शनास आली आहे. बहुतांश कार्यालयातील कर्मचारी हे कार्यालयात सकाळी उपस्थित झाल्यावर बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीवर नोंदविता तथापि कार्यालय सोडताना बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवीत नाहीत. यावरून सदरील कर्मचारी कार्यालयीन वेळी पूर्वीच कार्यालय सोडतात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर बाप कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने योग्य नाही. संबंधित कर्मचारी आदेशाचे पालन न करून कार्यालयीन शिस्तीचा भंग करत असल्याचे स्पष्ट होते.

 आधार बेस्ड बायोमेट्रिक उपस्थित उपस्थिती ॲप डाऊनलो


३)                त्या अनुषंगाने या परिपत्रकाद्वारे सत्क निर्देश देण्यात येतात की, कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी संदर्भीय परिपत्रकातील निर्देशानुसार दैनंदिन उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीवर नोंदवावी तसेच कार्यालयीन वेळ संपल्यावर बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवावी याबाबत तिरंगाही होणार नाही याची दक्षता घ्यावी देख कर्मचारी कार्यालयात आल्यानंतर व कार्यालयीन वेळ संपल्यानंतर बायोमेट्रिक उपस्थिती नोंदविणार नाहीत त्यांचे सदर दिवसाची अनाधिकृत उपस्थिती समजण्यात यावी व त्यांचे सदस्याचे वेतन कपात करण्याची कार्यवाही संबंधित कार्यालय प्रमुख यांनी करावी.
                      सदरील परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी.

🔹प्रतिलिपी आवश्यक त्या कार्यवाहीस्तव:-

१) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.परभणी
२) प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा परभणी.
३) विभाग प्रमुख........... जि.प.परभणी 
४) गटविकास अधिकारी, पंचायत समिती.........
५) गट शिक्षणाधिकारी अधिकारी,पंचायत समिती.........
६) बालविकास प्रकल्प अधिकारी, ए. बी. विसे प्रकल्प....
७) पशुधन विकास अधिकारी(वि.) पंचायत समिती.....
८) तालुका आरोग्य अधिकारी ता...........
९) उप अभियंता ( यांत्रिकी/ बांधकाम/ लघु पाटबंधारे / ग्रामाप ) उपविभाग ता....

 परिपत्रक डाऊनलोड करा 




सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यांकन प्रकल्प यादी व नमुने...

सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यांकन प्रकल्प यादी व नमुने... सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यांकन प्रकल्प यादी व नमुने... प्रकल्पाची व्याख्या:            प्...