सुस्वागतम...सुस्वागतम... सुस्वागतम...

प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेतर्गत प्रतिदिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणे बाबत.

प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेतर्गत प्रतिदिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणे बाबत  निर्णय.
        प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेतर्गत  इ. १ली ते इ.५वी मधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक १२ ग्रॅम प्रथिने युक्त तसेच इ. ६वी ते इ. ८ वी उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गांसाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो.
          केंद्र शासनाने दि. ०७ ऑक्टोंबर २०२२ रोजीच्या आदेशान्वये सन २०२२-२३या आर्थिक वर्षातील दि. ०१ ऑक्टोंबर, २०२२ पासून प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्चाच्या दरात ९.६ टक्के वाढ करण्याचे निर्देश दिलेले होते. यानुसार संदर्भाधिन दि. १५ नोव्हेंबर, २०२२ शासन निर्णयान्वये प्रति दिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी रु.५.४५ आणि उच्च प्राथमिक वर्गांसाठी रु.८. १७ याप्रमाणे निश्चित करण्यात आली होती. सद्यस्थितीत केंद्र शासनाने संदर्भाधिन दि.२७ नोव्हेंबर, २०२४ रोजींच्या आदेशान्वये प्रतिदिन प्रति विद्यार्थी आहार खर्चा दरवाढ केली आहे. त्यानुसार सदर प्रमाणे दर लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
 शासन निर्णय :-
                     १) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतर्गत प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे सुधारित आहार खर्चाच्या दरास मान्यता देण्यात येत आहे.
                     २) प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेतर्गत ग्रामीण भागामध्ये तांदुळासोबत इतर धान्याधी मालाचा पुरवठा शाळास्तरावर करण्यात येतो. सदर धान्याधी मालापासून आहार बनवण्यासाठी प्रार्थमिक आणि उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आहार खर्चाची विभागणी पुढील प्रमाणे करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

                     ३) प्रस्तुत योजनेतर्गत नागरी भागांमध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत तयार आहाराचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणांना खालील प्रमाणे अनुदान देय राहील.

                  ४) सदर प्रमाणे दरवाढ दि. ०१ मार्च, २०२५ पासून लागू करावी.
                 ५) सदरचा शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ४८०/४७१, दि. ०४ डिसेंबर, २०२४ तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १४१०/ व्यय-५, दि. १० जानेवारी, २०२५ अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
                    सदर शासन निर्णय महाराष्ट्र Treatment www.maharathtra.gov.in या संकेतस्थळावर  उपलब्ध करण्यात आलाअसून त्याचा संकेतांक २०२५०३०४१६४५२८९०२१हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
 महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
 शासन निर्णय डाऊनलोड करा :-शासन निर्णय

No comments:

Post a Comment

सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यांकन प्रकल्प यादी व नमुने...

सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यांकन प्रकल्प यादी व नमुने... सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यांकन प्रकल्प यादी व नमुने... प्रकल्पाची व्याख्या:            प्...