Monday, March 24, 2025

SQAAF Self assessment. शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा.

SQAAF Self assessment. शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा. 

शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा

 SQAAF Self assessment.शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा.

SQAAF- शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा School Quality Assessment and Assurance Famework, (SQAAF) राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 अंतर्गत शिक्षणाच्या सर्व टप्प्यांसाठी खाजगी आणि शासकीय शाळांचे मूल्यांकन आणि अधिकृत करण्यासाठी आवश्यक गुणवत्ता मानके सुनिश्चित करून,SQAAF हे मार्गदर्शक साधन विकसित करण्यात आले आहे.'शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा.


शाळा गुणवत्ता मूल्यांकन आश्वासन आराखडा मुद्दतवाढ परिपत्रक:-CLICK HERE


 

SQAAF Web Portal:- http://scert-data.web.app

शाळा गुणवत्ता मूल्यांकन आश्वासन आराखडा

शाळा गुणवत्ता मूल्यांकन आश्वासन आराखडा :-

राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 अंतर्गत, महत्त्वाचा घटक म्हणजे सार्थक प्लॅन टास्क क्र. 215' शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा.

राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 ची अंमलबजावणी संपूर्ण देशांमध्ये सुरू झाली असून, त्यात अनेक मूलभूत घटकांचा समावेश करण्यात आला आहे. 21 व्या शतकातील विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या शैक्षणिक बौद्धिक भावनिक आणि सामाजिक अशा सर्वांगीण गरजा पूर्ण करणाऱ्या, देशातील सर्व शाळा आदर्श असाव्यात. यासाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आश्वासरा आराखडा अस्तित्वात आणला आहे.

✴️मुख्याध्यापक यांना मार्गदर्शक सूचना :-  Click Here



शाळा गुणवत्ता मूल्यांकन आश्वासन आराखडा भरण्यापूर्वी मुख्याध्यापक यांना काही मार्गदर्शक सूचना देण्यात आले आहेत.SQAAF

✴️ शासन निर्णय डाऊनलोड करा :- Click Here

✴️ शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा वेब पोर्टल लिंक :-Click Here

शाळा गुणवत्ता मूल्यांकन आश्वासन आराखडा :-

SQAAF शाळा नोंदणी कशी करावी:-

1) scert-data-web.aap या लिंक ला क्लिक करा.
2) आता तुमच्यासमोर SQAAF चा इंटरफेस येईल.
     अ) खाते तयार करा.
     ब) लॉगिन 
     क) पासवर्ड
 हे तीन विंडो दिसतील.
3)" खाते तयार करा या विंडोला क्लिक करा, यात तुम्हाला पुढील विंडो दिसतील. "शाळा गुणवत्ता मूल्यांकन आश्वासन आराखडा "
अ) येथे ई-मेल प्रविष्ट करा - यात शाळेचा किंवा मुख्याध्यापकांचा ईमेल टाईप करा.
ब) या संकेतस्थळासाठीचा पासवर्ड- या तुमचा पासवर्ड तयार करा.

(टीप:-1 पासवर्ड कमीत कमी आठ अक्षरी असावा यात 1 कॅपिटल अक्षर,1 स्मॉल अक्षर,1 पेशल कॅरेक्टर,1 अंक सर्व मिळून आठ अक्षरे असावेत.)
क) बनवलेल्या पासवर्डची पुष्टी / खात्री करा- यात जो पासवर्ड तयार केला आहे तोच पुन्हा प्रविष्ट करा.
4) आत्ता खाते तयार करा या विंडोला क्लिक करा.
5) आता तुम्ही जो ईमेल एंटर केला होतात त्या gmail वर जा. तुम्हाला SQAAF कडून शाळा व्हेरिफाय करण्यासाठी एक मेल येईल त्यावर क्लिक करा व तुमची शाळा फेरिफाय करा.
6) आता पुन्हा scert-data-web. app या लिंक ला क्लिक करा.
7) आता तुमच्या स्क्रीनवर जो इंटरप्रिस येईल त्यातील लॉगिन या विंडोला क्लिक करा.
शाळा गुणवत्ता मूल्यांकन आश्वासन आराखडा

8) आता तुम्हाला दोन विंडो दिसतील.
अ ) येथे ई-मेल प्रविष्ट करा.
ब ) या संकेतस्थळासाठीचा पासवर्ड लिहा.
क ) लॉगिन आता क्लिक करा. शाळा गुणवत्ता मूल्यांकन आश्वासन आराखडा.
9) आता तुम्ही तुमच्या शाळेच्या साइटवर आला आहात.
10) तुम्हाला एकूण 128 मानके दिसत आहेत त्यासाठी काही मानके तुमच्या शाळेसाठी लागू नाहीत शिवाय प्रत्येक माणसाला क्लिक केल्यावर तुम्हाला मानकांमध्ये आणखी काही उपमानके आहेत.

✴️ मानक निहाय विधाने डाऊनलोड करा:-CLICK HERE
✴️SQAAF पुस्तिका डाऊनलोड करा :-CLICK HERE
✴️ कोरा फॉर्म डाऊनलोड करा :-CLICK HERE

शाळा नोंदणी व्हिडिओ :-



TAIT Exam 2025 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT Exam-2025)

TAIT Exam 2025 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT Exam-2025) 

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ℕ𝕖𝕨 𝕌𝕡𝕕𝕒𝕥𝕖...

MAHAJYOTI


प्रस्तावना:-

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारकार्याचा वसा चालविण्यासाठी, त्यांच्या विचारातला सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) स्थापना शासन निर्णय दि.०८.०८.२०१९ अन्वये (कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत कलम ८ नुसार) केली आहे. या अंतर्गत लक्षीत प्रवर्गासाठी उद्देशीत कार्यक्षेत्र व विशेष घटक स्थापिले आहेत.
• इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती (VJ), भटक्या जमाती (NT), आणि विशेष मागास वर्ग (SBC) तसेच शासन किंवा महाज्योतीने निश्चित केलेल्या वंचित व उपेक्षित जनसमुहांशी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाशी संबंधित समस्यांचा अभ्यास करणे आणि शासनास त्यावरील उपाययोजना सुचविणे.
• प्रमुख संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणून काम करणे व लक्ष्य गटांसाठी समाजिक शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी विविध उपक्रम राबविणे.
• कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच रोजगार, स्वयंरोजगार, उद्यमशिलता, औद्योगिक घटकांची उभारणी व विकास यासाठी क्षमता निर्मित करणे, विविध सर्वेक्षण व संशोधन करुन एक डाटा बॅंक, ग्रंथालये, ज्ञान बॅंक (knowledge bank) विविध क्षेत्रातील अभ्यास व समन्वय मंडळे स्थापन करणे, ते विकसित करणे, त्याची देखरेख करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे.
• वंचित घटकातील विद्यार्थी, लघु उद्योजक, शेतकरी आणि महिलांना विकासाची दिशा दाखवणारे, मार्गदर्शन करणारे, समुपदेशन केंद्रे स्थापन करणे.
• व्यक्तिमत्त्व विकास, नोकरीसाठी विविध स्पर्धा परीक्षा, उद्योग, व्यवसाय इत्यादींसाठी प्रशिक्षण, कोचिंग इ. प्रदान करणे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टायपेंड, शिष्यवृत्ती, फेलोशिप अनुदान देणे. लक्ष्य गटांची शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी धोरणात्मक कार्यवाही करणे.
• सामाजिक शास्त्राच्या विविध क्षेत्रांशी संबंधित विविध कार्यक्रम, उपक्रम इत्यादींशी संबंधित कृती संशोधन कार्यक्रम राबवणे. लक्ष्य गटांकरिता सामाजिक नियोजन, घटनात्मक कर्तव्ये आणि अधिकारांसह विविध क्षेत्रांमध्ये योग्य आणि व्यावसायिक कौशल्य प्राप्त करणे.
• राष्ट्रीय एकात्मता आणि वैज्ञानिक स्वभावाचा प्रचार करणे. त्याकरिता बंधुता, जातीय सलोखा आणि शांततापूर्ण सहअस्तित्व वाढवणे. स्वच्छता, सत्यशोधक विवाह, व्यसनमुक्ती, आणि पर्यावरणाबद्दल जागृकता निर्माण करणे.
• समानता आणि सामाजिक न्यायाचा प्रचार प्रसार करणे. लिंगभेद, जातीय भेदभाव, वंश पूर्वाग्रह आणि अंधश्रद्धा दूर करणे.
• महिला सक्षमीकरणाकरिता हुंडा निर्मूलन, जात-पंचायती, सामाजिक बहिष्कार, घरगुती हिंसाचार याबाबत विविध शैक्षणिक कार्यक्रम राबवणे. समाजिक माध्यमांचा वापर करुन यावर निबंध, वाद-विवाद, चर्चा घडवून आणने. माध्यमात प्रकाशित करणे.
• रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता, कृषी औद्योगिक घटकांसह औद्योगिक युनिट्सची स्थापना आणि विकास यासाठी क्षमता निर्माण करणे. त्याकरिता विविध सर्वेक्षणाचा अभ्यास करणे. मूल्यमापन कौशल्य विकास प्रशिक्षण राबवणे.
दि.२६.०२.२०२० च्या शासन निर्णयान्वये संस्थेचे मुख्यालय नागपूर येथे स्थलांतरित करण्यात आलेले आहे. महाज्योतीच्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ पोहचविणे सुलभ व्हावे या हेतूने महाज्योतीचे विभागीय कार्यालय औरंगाबाद, नाशिक येथे सुरु करण्यात आलेले असून पुणे, मुंबई व अमरावती येथे विभागीय कार्यालय सुरु करण्याची कार्यवाही सुरु आहे.
महाज्योती मार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास – प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी या हेतूने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, JEE/NEET/MHT-CET, MPSC, UPSC आदी स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते. उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी या करिता कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो तसेच विविध संशोधन कार्याला प्रोत्साहन मिळावे याकरिता पीएचडी व एम.फिल करणाऱ्या उमेदवारांना अधिछात्रवृत्ती प्रदान करण्यात येते.

𝕋𝔸𝕀𝕋 𝟚𝟘𝟚𝟝-𝟚𝟞 𝕄𝔸ℍ𝔸𝕁𝕐𝕆𝕋𝕀 प्रशिक्षण मोफत काय आहे योजना जाणून घेण्यासाठी टच करा:-CLICK HERE




पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरात जाहिरातीच्या कार्यवाहीस मुदतवाढ बाबत.

परिपत्र पाहा



✴️पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरात जाहिरातीच्या  कार्यवाहीस मुदतवाढ बाबत.



 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अभ्यासक्रम:- 

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा आराखडा व अभ्यासक्रम खालील प्रमाणे.

------------------------------------------------------------------------------------------

TAIT Exam पेपर साठी 2 घटक असतात अभियोग्यता व बुद्धिमत्ता व परीक्षा ही एकूण 200 प्रश्नांची व 200 गुणांची असेल, म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण देण्यात येईल.

✴️ अभियोग्यता 120 प्रश्न(60% प्रश्न )पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरात जाहिरातीच्या कार्यवाहीस मुदतवाढ

✴️ बुद्धिमत्ता 80% प्रश्न (40% प्रश्न)

💠 एकूण-200 गुण

⏰वेळ :- 2 तास 


शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता  चाचणी (TAIT Exam-2025)

-----------------------------------------------------------------------------------


✒️ अभियोग्यता या घटकांमध्ये पुढील उपघटकांचा समावेश होतो.


1)आकलन

'शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता  चाचणी (TAIT Exam-2025)'

2) तर्क क्षमता

3) वेळ आणि अचूकता 

4) इंग्रजी भाषिक क्षमता 

5) मराठी भाषिक क्षमता 

6) अवकाशीय क्षमता 

7)कला /आवड 

8) समायोजन / व्यक्तिमत्व 

------------------------------------------------------------------------------------------

✒️ बुद्धिमत्ता या घटकांमध्ये पुढील उपघटकांचा समावेश होतो.

1) आकलन 

2) वर्गीकरण

3) सांकेतिक भाषा 

4) लयबद्ध मांडणी 

5) समसंबंध 

6) कुठप्रश्न 

7) क्रमश्रेणी 

8) तर्क व अनुमान 

------------------------------------------------------------------------------------------

💠 शिक्षक अभियोग्यता चाचणी अभ्यासक्रम PDF:-TAIT Syllabus PDF

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT Exam-2025)

------------------------------------------------------------------------------------------

💠 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा-2025 प्रसिद्धी निवेदन.



✴️शिक्षक अभियोग्यता चाचणी प्रसिद्ध निवेदन 2025:- TATIपरीक्षा2025 निवेदन


✴️ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा-2025 चे नियोजन लवकरच परीक्षा परिषदेमार्फत करण्यात येत आहे, तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षा बाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आव्हान करण्यात आले आहे.

See more details :- https://www.mscepune.in/



💐💐💐 परीक्षेसाठी शुभेच्छा💐💐💐



Sunday, March 23, 2025

प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेतर्गत प्रतिदिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणे बाबत.

प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेतर्गत प्रतिदिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणे बाबत  निर्णय.
        प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेतर्गत  इ. १ली ते इ.५वी मधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक १२ ग्रॅम प्रथिने युक्त तसेच इ. ६वी ते इ. ८ वी उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गांसाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो.
          केंद्र शासनाने दि. ०७ ऑक्टोंबर २०२२ रोजीच्या आदेशान्वये सन २०२२-२३या आर्थिक वर्षातील दि. ०१ ऑक्टोंबर, २०२२ पासून प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्चाच्या दरात ९.६ टक्के वाढ करण्याचे निर्देश दिलेले होते. यानुसार संदर्भाधिन दि. १५ नोव्हेंबर, २०२२ शासन निर्णयान्वये प्रति दिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी रु.५.४५ आणि उच्च प्राथमिक वर्गांसाठी रु.८. १७ याप्रमाणे निश्चित करण्यात आली होती. सद्यस्थितीत केंद्र शासनाने संदर्भाधिन दि.२७ नोव्हेंबर, २०२४ रोजींच्या आदेशान्वये प्रतिदिन प्रति विद्यार्थी आहार खर्चा दरवाढ केली आहे. त्यानुसार सदर प्रमाणे दर लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
 शासन निर्णय :-
                     १) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतर्गत प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे सुधारित आहार खर्चाच्या दरास मान्यता देण्यात येत आहे.
                     २) प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेतर्गत ग्रामीण भागामध्ये तांदुळासोबत इतर धान्याधी मालाचा पुरवठा शाळास्तरावर करण्यात येतो. सदर धान्याधी मालापासून आहार बनवण्यासाठी प्रार्थमिक आणि उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आहार खर्चाची विभागणी पुढील प्रमाणे करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

                     ३) प्रस्तुत योजनेतर्गत नागरी भागांमध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत तयार आहाराचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणांना खालील प्रमाणे अनुदान देय राहील.

                  ४) सदर प्रमाणे दरवाढ दि. ०१ मार्च, २०२५ पासून लागू करावी.
                 ५) सदरचा शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ४८०/४७१, दि. ०४ डिसेंबर, २०२४ तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १४१०/ व्यय-५, दि. १० जानेवारी, २०२५ अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
                    सदर शासन निर्णय महाराष्ट्र Treatment www.maharathtra.gov.in या संकेतस्थळावर  उपलब्ध करण्यात आलाअसून त्याचा संकेतांक २०२५०३०४१६४५२८९०२१हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
 महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
 शासन निर्णय डाऊनलोड करा :-शासन निर्णय

निपुण महाराष्ट्र अंतर्गत VSK Chat bot app वर अध्ययन स्तरनिश्चिती मूल्यांकन नोंदवण्याची सुविधा सुरू.

निपुण महाराष्ट्र कार्यक्रम...


शासन निर्णय:-(डाउनलोड)


VSK Chat bot app :- डाउनलोड  


 अध्ययन स्तर निश्चिती फॉर्म :-डाउनलोड





सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यांकन प्रकल्प यादी व नमुने...

सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यांकन प्रकल्प यादी व नमुने... सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यांकन प्रकल्प यादी व नमुने... प्रकल्पाची व्याख्या:            प्...